मी चालत आसताना पाय अचानक थांबतात,
कुठुन तरी ओळखीचे शब्द काणी पडतात,
ह्र्दयाचे ठोके ही हळुहळु वाढतात,
मन आणी ङोळे दोघं ही मागं वळुन पहातात,
त्या आशेच्या नजरेने मागं वळुन पहाताना,
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.....
त्या दीवशी मी जरा जास्तच घाईत होतो,
गदी असताना ही ट्रेन मध्ये शीरलो होतो,
अचानक कुणीतरी ओळखीचं वाटलं,
तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं,
उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना,
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.....
नको असतानाही मित्र फिरायला घेवुन जातो,
एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो,
विसरता यावं तुला म्हणुन मीही त्या गदीत शीरतो,
शोधतो त्या मानसांत एखादा ओळ्खीचा चेहरा,
त्या लाखोंच्या गदीत ही मी एकटाच फिरताना,
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.....
दिवसा उजेडात स्वतःला सावरताना,
सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना,
रोज रात्री जागरण करताना,
पांघरुन घेवुन अश्रु ढाळताना,
जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो,
तेव्हा ही मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.....
No comments:
Post a Comment