एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी,
अन् मलाही तिच्यासोबत भिजायला लावणारी...
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी,
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी...
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी,
माझ्या बहुपाशात, अलगद येऊन बसणारी...
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी,
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर दिसणारी...
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी,
आमच्या नात्याला हळुवारपणे जपणारी...
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जानणारी,
मी जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी...
एक प्रेयसी पाहिजे, प्रेमाला प्रेम समजणारी,
सुखा-दु:खात माझ्या तन्मयतेने साथ देणारी...
एक प्रेयसी पाहिजे..................................मिळेल का अशी???????
No comments:
Post a Comment