Thursday, October 25, 2007

ती किती वेडी आहे, .........




ती किती वेडी आहे,
एवढीशी गोष्ट तिला समजली नाही
मी किती वेडा आहे,
मला एवढीशी शी गोष्ट सांगता आली नाही

ती किती वेडी आहे,
डोळ्यातल्या भावना तिला काळात नाही
मी किती वेडा आहे,
तिच्या डोळ्यातच पाहत नाही

ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्ट निरखून पाहते
मी किती वेडा आहे,
प्रत्येक गोष्टीत तिला पाहतो

ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्टीवर रागावते
मी किती वेडा आहे,
मला तीच रागवणं ही आवडतं

ती किती वेडी आहे,
उद्या तीचं लग्न आहे
मी किती वेडा आहे,
तिच्या लग्नाची तयारी करतोय.....

No comments: