Thursday, October 25, 2007

हिच प्रेमाची पहिली पायरी असते...............

अनोळखी हास्य...
गालातंच हसतं...
खुळं आपलं मन...
अगदी अलगद फसतं...

जीवनाच्या वळणावर...
हा सुखद धक्का असतो...
डोळ्यांच्या लपंडावात...
विचार मात्र पक्का असतो...

दोन जीवांची भेट होते...
नजरेला नजर 'सेट' होते...
तिने टाकलेल्या गुगलीवर...
त्याची खासी 'विकेट' जाते...

तीचा हात त्याच्या हातात असतो...
तो (अंतर्बाह्य) पेटलेला असतो...
ती लाजेनं कावरी बावरी होते...
हिच प्रेमाची पहिली पायरी असते!!!

No comments: