Friday, April 25, 2008

मी...ती


मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

Saturday, November 10, 2007

कुणीतरी असावं.....


माझ्याच विचारांनी दिवस सुरू करणारं असावं,
काळजी घे स्वत:ची म्हणताना कळवळणारं असावं,
आई बाबांसोबत असताना फोन कट करणारं नसावं,
त्यांना कळणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं असावं,
दिवसभर माझ्या फोनची वाट पहाणारं असावं,
फोन का केला नाही म्हणून तक्रार करणारं असावं,
प्रत्येक दिवशी मला भेटण्याची ओढ असणारं असावं,
सुट्टीच्या दिवशी माझ्यासाठी वेळ काढणारं असावं,

बोलणं तिचं दिवसभराचा शीण घालवणारं असावं,
डोळ्यातला भाव समजणारं मन तिचं असावं,
एखाद्या भावनिक क्षणी डोळ्यात पाणी आणणारं असावं,
खरंच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं कुणीतरी असावं!!!

Saturday, November 3, 2007

मला हरवून टाकलेस तू.....

मला हरवून टाकलेस तू.....
काय सखे तु जादू केलीस,
मी माझ्यातच हरवून गेलो,
तुझ्या आसीम प्रेमाखातर,
माझं मलाच विसरून गेलो,
तुझे ते बंदिशातले केस,
आज अचानक वार्‍यासवे डोलू लागले,
जणु माझ्या भुललेल्या चेहर्‍यावर,
पिसार्‍यातले सारे मोरपिस गुदगुल्या करू लागले,
माझे ते छुपे इशारे अन,
तुझ्या त्या घाबरलेल्या नजरेचे तीर सारे,
माझ्या काळजाचा ठाव घेऊ लागले,
नकळत एवलूष्या जागेत तुझ्या प्रेमाचे बोन्साय वाढू लागले,
काय म्हणावा तुझा तो नखरा,
जणू बारमाही ठरलेला दिवाळी अन दसरा,
मी आपलं स्वत:ला त्यात गुंतवत गेलो,
आनंदाचे दिस कायमचे बस आपलेसे करत गेलो,
तु नाही दिसायची डोळ्यासमोरी माझ्या,
तेव्हा माझ्या पापण्याही जड व्हायच्या,
मान उंचावूनी मग त्या नयन बाहूल्या,
चराचरात तुला,रातनदिस शोधत रहायच्या,
तुझ्यासोबत मी अनुभवला तो श्रावण मंद सरींचा,
काय सांगू तुला मला कधी जाणवलच नाही,
असाही असतो पाऊस लहरीचा अन,
गोड गुलाबी मंद शिरशिरीचा,
कधी भांडलो तुझ्याशी उगाच,
अन कधी तरसवले मी तुला कारणांविनाच,
मग तुझी माफी मागताना साजने,
केला मी स्वत:ला एका पायवर उभा राहुनी अजब शिक्षेचा जाच,
बघ कसा हरवलो सखे मी तुझ्यात,
तुच सांग आता ही प्रेमाची कुठली जात???
का झालोय मी प्रेमवेडा अन,
सामावूनी गेलोय तुझ्या त्या अमर आत्म्यात........

कॉलेजला जाताना.....


कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली,
मी दिसताच चालता चालता जरा थांबली,
माझ्याकडे बघुन गोड हसलीओठांची मोहोळ खुलली...
म्हटलं पोरगी बहुतेक पटली,
पण...हत तिच्या मारी,
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली...

त्या दिवशी ती वर्गात आली,
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली,
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली,
बोलाण्यासाठी जीभ सरसावली...
पण...हत तिच्या मारी,
काही बोलणार इतक्यातच म्हणाली,
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली,
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली,
पाठुनच तिनं एक हाक मारली,
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली,
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली...
पण...हत तिच्या मारी,
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली,

शेवटी मनाची तयारी केली,
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली,
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली,
गालावरची खळी पाहीली...वाटलं बहुतेक देवी पावली,
पण...हत तिच्या मारी,
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली"!!!

Monday, October 29, 2007

"........आम्ही पुणेकर........."

"........आम्ही पुणेकर........."

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance....
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance.....

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो....
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minitaत मागे सारतो....

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो...
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो...

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो....
भले जयंती दोनदा साजरी करो....
पण साजरी तर करतो.....

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो.....
आणि वर मान करून,
मामाला 'मामा' बनवतो.....

galsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही....
ये नही और सही....
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे...
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे...
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे....

त्याचे काय आहे....

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत....
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे 'माहेरघर' म्हणत....

(आम्ही पुणेकरच हो..........)

मन तळ्यात मळ्यात......




मन तळ्यात मळ्यात,
जाईच्या कळ्यात,
मन नाजूकशी मोतीमाळ,
तुझ्या नाजूकशा गळ्यात.....

उरी चाहुलीचे मृगजळ,
वाजे पाचोळा उगी कशात,

इथे वा-याला सांगतो गाणी,
माझे राणी,
आणी झुळूक तुझ्या मनात.....

भिडू लागे रात अंगालागी,
तुझ्या नखाची कोर नभात,

माझ्या नयनी नक्षत्रतारा,
आणी चांद तुझ्या डोळ्यात,

मन नाजूकशी मोतीमाळ,
तुझ्या नाजूकशा गळ्यात,
मन तळ्यात मळ्यात,
जाईच्या कळ्यात........

आयुष्यातले प्रत्येक क्षण.....


आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजत असता,

मला हळूच चाहूल लागून जाते,
एक सावली पडून जाते,
थंड वारं वाहवून जाते...

तेव्हापासून सारखी मी वाट पाहतो,
त्या सावलीची थंड वाय्राच्या झोक्याची,
नजरेसमोर येणाय्रा त्या व्यक्तिच्या प्रतिबिंबाची...

तेव्हा पासून,
मन माझे मला सांगत असते,
वाट पाहायची,
वाट पाहयची,

कधीतरी ती व्यक्ति समोर येते,
मनाला आनंदाचा अस्वाद देते,
तिच्या फक्त गोड शब्दांमधून,
अनेक गोडवे जाणवतात...

तेव्हा माझे मन स्वत: ठरवते,
सर्व काही मिळवीन,
सर्वकाही सोसीन,
आयुष्यातला प्रत्येक क्षण देईन...

आयुष्यातील सर्व दु:ख,
गोळीसारखी एकाच वेळी गिळून टाकीन,
डोळ्यातले अश्रु न थांबल्यास तुझे चित्र पाहीन,
अन डोळे मिटिन...

मला असेच वाटते.....
आयुष्य जगावे,
सर्व काही संपवावे.....
प्रत्येक क्षण सोनेरी बनवावा

हे ह्र्दय काढून द्यावे
फक्त तुझ्याच साठी